News Flash

राज्यात महावितरण ‘मोबाईल अॅप’चा ग्राहकांना फायदा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महावितरण वीज ग्राहकांना अतिशय तत्पर आणि जागतिक दर्जाची उच्च सेवा मिळावी यासाठी महावितरणने गेल्या वर्षीच महावितरण मोबाईल अॅपची निर्मिती केली. महाराष्ट्रात २ कोटी ४३ लाख महावितरण वीज ग्राहक असून सध्या २७ लाख ग्राहक महावितरण मोबाईल अॅपचा वापर करत आहेत.

ग्राहकांना खात्रीचा, दर्जेदार, स्पर्धात्मक आणि रास्त दरात परवडणारा विजपुरवठा करणे आणि त्याद्वारे राज्याच्या कृषी औद्यगिक आणि सर्वागीण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महावितरण सातत्यने नवनवीन योजना राबवत असते. वीज वितरणातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन अविष्कार घडवण्यासाठी शिवाय महावितरणचे ग्राहक व कर्मचा-यांतील व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी महावितरण मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून नेटबँकिंग, क्रेडीट डेबिट कार्डच्या माध्यमातून वीजबिल भरणा, मागील आणि चालू बिलांची आणि पावत्यांची पाहणी, विजपुरवठा किवा देयकांसंबधी तक्रारी नोंदविणे आदी सोयी उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध न झाल्यास ग्राहकास एसएमएस पाठविला जातो. त्यानंतर ग्राहक या अॅपद्वारे आपल्या मिटर फोटोसह रीडिंग पाठवू शकतो. तसेच नवीन वीज कनेक्शन जोडण्यासाठी या अॅपवरून नवीन वीज जोडणी अर्ज भरल्यानंतर अवघ्या काही तासातच आपल्याला कनेक्शन दिले जाते. महावितरणने केलेला हा बदल वीज ग्राहकांसाठी सोयीस्कर वाटत असल्याने सध्या २७ लाख ग्राहक या मोबाईल अॅपचा वापर करत आहेत. या अॅपचा ग्राहकांनी जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन महावितरनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!