News Flash

नवे पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूखंड केला हडप : प्रल्हाद झांबरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील साडेतीन गुंठ्यावरील गेस्ट हाऊस दुस-याच्याच नावावर वर्ग झाल्याचे आज (शुक्रवार) जि.प.च्या सर्वसाधारण सभेत पंचायत समिती सभापती प्रल्हाद झांबरे यांनी उघडकीस आणले.

नवे पारगाव येथील भूखंड क्रं. १०३३ येथे सुमारे एक एकराच्या परिसरामध्ये जिल्हा आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातल्या साडेतीन गुंठ्यावरील भागावर जिल्हा परिषदेचे गेस्ट हाऊस बांधण्यात आले आहे. हे गेस्ट हाऊस १९७० पासून जि.प.च्या नावावर आहे. पण अचानकपणे २००९ पासून ते प्रल्हाद शंकर साळुंखे यांच्या नावावर लागल्याचे दप्तरी नोंद झाली आहे. ही बाब उपसंचालक भूमी अभिलेख पुणे, यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत कोर्टामध्ये वाद सुरु आहे. परंतु संबंधीत प्रकरणाच्या तारखेला जि.प.चे वकील गैरहजर राहतात. त्यामुळे हा भूखंड साळुंखे यांच्या घशात जाण्याची शक्यता प्रल्हाद झांबरे यांनी व व्यक्त केली.

याबाबत सभागृहात या विषयावर प्रचंड गोंधळ झाला. संबंधीत अधिका-यांनी या भूखंडाबाबत त्वरीत निर्णय घेऊन जिल्हा परिषदेची मालमत्ता खाजगी मालकाच्या घशात जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!