News Flash

राज्य अर्थसंकल्पात शेतीविकास, शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी

मुंबई (प्रतिनिधी) : ‘गावाकडे चला’ असा नारा देत शेतकऱ्यांसाठी विविध योजना मांडणारा आणि कर्जमाफीमुळे सरकारची घोषणा मलिन झाल्यामुळे त्यांच्यावर विविध योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) जाहीर केला. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग आणि विकास यासह अनेक क्षेत्रांमध्ये तरतूदी करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारच्या या शेवटच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. राज्याचं महसुली उत्पन्न २ लाख ८५ हजार ९६८ कोटी झाला तर महसुली खर्च ३ लाख १ हजार ३४३ झालाय. राज्याची महसुली तूट तब्बल १५ हजार ३७५ कोटीचा हा अर्थसंकल्प होता.  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील अशी ग्वाही देत शेतीसाठी मुनगंटीवार यांनी अनेक घोषणा केल्यात.

जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी एवढा विशेष निधीची तरतूद करण्यात आलीये.  मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण झाली आणि ह्यासाठी १६० कोटी एवढा निधी खर्च करण्यात आला.  शेतक-यांना पीक आणि पशुधन याबरोबर उत्पन्नाचा नवीन स्रोत म्हणून वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्यासाठी १५ कोटी रु. निधी प्रस्तावित करण्यात आलाय.

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाला अनुसरून उत्पादन खर्च मर्यादित राहील ह्या उद्देशाने सेंद्रीय शेती- विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटींची तरतूद देण्यात आलीये. तसंच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय. आतापर्यंत ४६.३४ लाख कर्जखातेधारकांना रु. २३१०२.१९ कोटी इतक्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे अशी माहितीही मुनगंटीवारांनी दिली. त्याचबरोबर लघू उद्योजक, सुक्ष्म उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!