News Flash

जि.प.सभेत औषध घोटाळ्यावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी धारेवर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्हा परिषदेत आज (शुक्रवार) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये औषध घोटाळ्याबाबत जि.प.सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त करीत  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना धारेवर धरले. याबाबत आपली बाजू मांडताना  चौकशी समिती नेमली असून यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन खेमणार यांनी दिले.

जि.प.च्या दालनात झालेल्या आजच्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीलाच पोलीस निरिक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुनाबाबत संताप व्यक्त करुन दोषींवर कडक कारवाई व्हावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. या सभेमध्ये औषध घोटाळ हा केंद्रस्थानी राहिला. त्याचा प्रभाव संपूर्ण सभा संपेपर्यंत कायम राहिला. याबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिका-यांना धारेवर धरताना यड्रावचे राजवर्धन निंबाळकर यांनी आयुक्तांनीच रजेवर जावे, अशी मागणी केली. कारण या घोटाळ्याबाबत आपण पुर्वकल्पना दिली असतानाही खेमणार यांनी त्याची वेळेवर दखल घेतली नाही. याचा परिणाम म्हणजे घोटाळ्याची व्याप्ती वाढली.

याबाबत उत्तर देताना खेमणार म्हणाले की, औषध खरेदी प्रकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची अनियमीतता झाल्यास त्याला जिल्हा आरोग्याधिकारी जबाबदार असतात. याबाबतचा अहवाल २३ मार्चला मला मिळाला. त्यानंतर तत्काळ मी वित्तीय आणि तांत्रिक मुद्द्यांची छाननी केली. तसेच ३ मार्चला मुख्य लेखाधिकारी यांना प्रशासकीय अहवाल मागितला. घोटाळ्याच्या संबंधीत अधिका-यांना नोटीसा काढल्या. यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला. यावर जि.प.सदस्य विजय भोजे यांनी घोटाळ्याच्या चौकशी समितीमधील सभागृहातील काही सदस्यांना स्थान द्यावे. जेणेकरुन हा तपास निपक्षपातीपणे केला जाईल, असा ठराव मांडला. यावर सर्वांचे एकमत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!