News Flash

विजय मल्ल्याकडे कर्जापेक्षा अधिक संपत्ती : वकिलाचा कर्नाटक हायकोर्टात दावा

बेंगळूरू (वृत्तसंस्था) : किंगफिशर एअरलाइन्सच्या ६००० कोटी रुपयांसह सगळं कर्ज फेडण्यास विजय माल्या यांची युनायटेड ब्रुवरीज ही कंपनी सक्षम आहे. युबी ग्रुपची एकूण मालमत्ता व शेअर्सचे बाजारमूल्य यांची किंमत १२, ४००  कोटी रुपये आहे. मात्र कंपनीची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केल्यामुळे कोर्टाने कंपनीला कर्जफेडीचा प्रस्ताव देण्यास सांगितले होते त्याचे पालन करता येत नसल्याचा युक्तिवाद मल्ल्याच्या वकिलाने केला. कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिनेश महेश्वरी यांनी खटल्याच्या कामकाजाला एप्रिलपर्यंत स्थगिती दिली.

किंगफिशर एअरलाइन्सचा कॉर्पोरेट गॅरंटर युबी समूह असून कंपनीचा अध्यक्ष विजय मल्ल्या देशातून पळून  इंग्लंडला गेला आहे. आज कर्नाटक हायकोर्टात ज्येष्ठ विधीज्ञ साजन पोवय्या यांनी कोर्टात सांगितले की, जानेवारीमध्ये कंपनीच्या मालमत्तांचे एकूण मूल्य १३, ४००  कोटी रुपयांचे होते, मात्र बाजारातील चढउतारांमुळे आता हे मूल्य १२, ४००  कोटी रुपयांइतके घसरले आहे. सगळ्या कर्जांचा विचार केला तरी एकूण कर्ज १० हजार कोटींपेक्षा जास्त नसल्याचे वकिलांनी म्हटले आहे.

उदय होला या वकिलांनी सांगितले की सक्तवसुली संचालनालयानं सगळं काही जप्त केलं आहे. कर्नाटक हायकोर्टाकडे पडून असलेले १२८० कोटी रुपये गुंतवलेले असते तर १३७ कोटी रुपयांचं व्याज मिळालं आहे. अर्थात, यावर कोर्टानं सांगितलं की एकूण मालमत्तेचा दावा करताना शेअर्सच्या किमतीवर फार अवलंबून राहता येणार नाही कारण शेअर्सच्या किमतीत चढउतार होत असतात. पुढे सरकण्यासाठी काहीतरी ठोस प्रस्ताव येण्याची गरज कोर्टानं व्यक्त केली आणि सुनावणी स्थगित केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!