News Flash

जाणून घ्या, राज्याच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे…

मुंबई (प्रतिनिधी) :  विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा २०१८-१९ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) दुपारी दोन वाजता सादर करण्यास सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प शेतकरीकेंद्रित असेल, असे संकेत त्यांनी काल दिले होते.

अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी व घोषणा पुढीलप्रमाणे – :

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त करण्याचा सरकारचा प्रयत्न

जलसंपदा विभागासाठी ८२३३ कोटींची तरतूद

एसटीमार्फत मालवाहतूक सेवा सुरू करणार

जलयुक्त शिवारसाठी १५०० कोटींची तरतूद

राज्यात सहा कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार

प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार ; त्यासाठी ५० कोटींची तरतूद

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे भांडवल ५० कोटींवरून ४०० कोटींवर

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ४३२ कोटींची तरतूद

राज्यातील एसटी बसस्थानकांच्या डागडुजीसाठी १४२ कोटींची तरतूद

शिवाजी महाराज स्मारकासाठी अंतिम निविदा ; ३०० कोटींची तरतूद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!