News Flash

महिलांनी आपली क्षमता जाणल्यास क्रांती घडेल : संगीता राजापुरकर-चौगुले 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवतेचे स्थान दिले आहे. प्रत्येक कर्तबगार पुरुषामागे स्त्रीचा हात महत्वाचा आहे. बंधने, नियम झुगारणे हे आपल्या हातात आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्यातील क्षमता जाणून घेतल्या तर जीवनात क्रांती घडू शकते, असे प्रतिपादन प्रांताधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले यांनी केले. त्या महिला दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थीनींच्या सत्कार समारंभात बोलत होत्या.

रावसाहेब आण्णा कित्तूरकर ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी होते.

यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती यामिनी बोरावके म्हणाल्या की,  महिलांनी काळानुसार बदलले पाहिजे. पण हे बदल मर्यादितच असले पाहिजे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी यामिनी बोरावके, प्रिया दुर्गावडे, संगीता राजापुरकर-चौगुले, रत्नमाला घाळी, सिमरन मुजावर, अंकिता मटकर, प्राची पोटे, सृष्टी कुलकर्णी, स्नेहा कुलकर्णी, अंकिता जाधव, वर्षाराणी पोवार, शितल हेब्बाळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सहदिवाणी न्यायाधीश ऋषिकेश कुलकर्णी, प्रा.सी.एस. मठपती, ज्युनिअर विभागप्रमुख प्रा.सी.बी.कानडे, विज्ञान शाखेचे विभागप्रमुख प्रा. कांचन देवलपल्ली, प्रा. अनिता माळगी, अश्विनी पाटील, प्रा. शिवानी पेडणेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!