News Flash

सूफी गायक प्यारेलाल वडाली यांचे निधन

अमृतसर (वृत्तसंस्था) : सूफी संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या गायनशैलीने कानसेनांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या वडाली ब्रदर्स या जोडीतील उस्ताद प्यारेलाल वडाली (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उस्ताद पूरणचंद वडाली यांचे ते धाकटे बंधू होत. त्यांनी आज (शुक्रवारी) सकाळी अमृतसर येथील फोर्टीज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक पोकळीच निर्माण झाली आहे.

पंजाबी सूफी संगीतामध्ये त्यांचे अतिशय मोलाचे योगदान असून, तरुणाईच्या प्लेलिस्टमध्येही त्यांच्या गाण्यांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी एमटीव्ही कोक स्टुडिओमध्ये त्यांनी सादर केलेल्या तू माने या ना…’ या गाण्याने बरीच लोकप्रियता मिळवली होती. वडाली ब्रदर्स यांनी जालंधर येथील हरबल्लाह मंदिरातून आपल्या गायनाची सुरुवात केली होती. त्यांच्या गायनशैलीत एक वेगळ्याच प्रकारचा साज असून, हीच वेगळी शैली त्यांना या क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची ठरली होती. वडाली ब्रदर्स प्रामुख्याने काफियाँ, गझल आणि भजन या प्रकारच्या गायनासाठी ओळखले जातात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!