News Flash

निरोगी शरीरासाठी सर्व बाबींचे संतुलन आवश्यक : डॉ. कालिंदी रानभरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजकाल मानवाच्या निरोगी शरीराची व्याख्या त्यांच्या शारीरिक स्थितीवरून ठरविण्यात येते. ती चुकीची असून मानवाच्या शरीरावर मानसिक, शारीरिक व सामाजिक स्थितीचा परिणाम होत असतो. म्हणूनच या तिन्ही बाबींचे योग्य संतुलन जिथे राखले जाते तेच निरोगी शरीर होय, असे प्रतिपादन डॉ.कालिंदी रानभरे यांनी केले. त्या गोकुळने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यामध्ये बोलत होत्या.

यावेळी ‘स्त्रियांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चेअरमन विश्वास पाटील  होते. तसेच डॉ.कालिंदी रानभरे, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, महिला संचालिका जयश्री पाटील-चुयेकर, सौ.अनुराधा पाटील हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विश्वास पाटील म्हणाले की, दुग्धव्यवसाय प्रामुख्याने महिला करीत असतात. सर्वच क्षेत्रात त्यांचा सहभाग मोठा आहे. याची जाणीव ठेऊनच महिलांना सर्व ठिकाणी समान संधी द्यावी असे स्पष्ट करून महिला दिनानिमित्त गोकुळ परिवारातर्फे जिल्ह्यातील सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच डॉ. कालिंदी रानभरे म्हणाल्या की, आपले निरोगी मन व शरीरासाठी आहारही तितकाच महत्वाचा घटक आहे. शारीरिक आजार औषधाने बरा करता येतो, पण मानसिक आजारावर औषध नाही. त्यामुळे प्रत्येकाने मन निरोगी ठेवण्यासाठी आपले आचार, विचार याचबरोबर नैतिकता शुद्ध ठेवावी, असे सांगितले.

यावेळी संचालक विश्वास जाधव, उदय पाटील, सत्यजित पाटील, गोकुळचे पदाधिकारी, महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!