News Flash

सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा : सोमवारी विधानभवनावर धडकणार

नाशिक (प्रातिनिधी) : सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, सर्व धोरणे शेतकरीविरोधी आहेत, असा आरोप करीत नाशिक जिल्ह्यातले शेतकरी किसान सभेच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. आज (शुक्रवार) शेतकऱ्यांच्या नाशिक ते मुंबई महामोर्चास सुरुवात झाली. यामध्ये सुमारे ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले आहेत.

राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत सुरु झालेला हा मोर्चा १२ तारखेला म्हणजेच सोमवारी  विधान भवनावर धडकणार आहे. आस्मानी संकट आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आयुष्य संपवण्याचीही वेळ येते आहे. कर्जमाफीही फसवी आहे. त्यामुळेच सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी आणि शर्तींंशिवाय कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला दीडपट हमीभावापेक्षा कमी भाव देऊ नये, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारसींची अंमलबजावणी तातडीने करावी अशा मागण्या करत किसान सभेने केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!