News Flash

…आणि जान्हवी कपूरने केली शुटिंगला सुरुवात…

मुंबई (प्रतिनिधी) : श्रीदेवीच्या निधनामुळे तिच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीला जबर धक्का बसला होता. मात्र आता या धक्क्यातून स्वत:ला सावरत जान्हवीने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. जान्हवीचा पहिला चित्रपट धडकच्या चित्रीकरणासाठी जान्हवी कालपासून सेटवर परतली आहे. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर चौदा दिवसांनी जान्हवी घराबाहेर पडली. आणि तिने आपल्या शुटिंगला सुरुवात केली.

जान्हवीच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यात ती हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे. इंग्लिश विंग्लिश चित्रपटात जशाप्रकारे श्रीदेवी साध्या कॉटनच्या साडीत दिसलेली तसाच काहीसा जान्हवीचा हा लूक आहे. त्यामुळे जान्हवीच्या या फोटोत अनेकांना श्रीदेवीची छबी दिसत आहे. श्रीदेवीच्या मृत्युमुळे मानसिकरित्या खचलेल्या जान्हवीला सेटवर काही त्रास होऊ नये म्हणून या चित्रपटाचा निर्माता करण जोहर विशेष काळजी घेत आहे. जान्हवीवर कामाचा ताण येणार नाही अशा प्रकारे चित्रीकरण करण्याची ताकीद त्याने सेटवर दिलेली आहे. तसेच तो स्वत:देखील काही दिवस जान्हवीसाठी जातीने हजर राहणार असल्याचे समजते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!