News Flash

सुप्रीम कोर्टाची स्वेच्छामरणावर ‘सशर्त मोहोर.!.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रीम कोर्टाने आज (शुक्रवार) स्वेच्छा मरणाबाबत एक ऐतिहासिक निर्णय दिला. काही शर्तींवर स्वेच्छा मरणाला परवानगी देत अनेक वृद्ध तसेच जराजर्जर रुग्णांना, तसेच जीवनाची अजिबातच आसक्ती नसलेल्या व्यक्तींना दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए के सिकरी, न्या. ए एम खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. ए. भूषण यांच्या घटनापीठाने हा निर्णय जाहीर केला.

          स्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, एखादी व्यक्ती जिवंतपणी असे इच्छापत्र करू शकते की भविष्यात कधीही मी बरा होऊ न शकणाऱ्या कोमामध्ये गेलो तर मला कृत्रिमरित्या जगवणारी वैद्यकीय सेवा (व्हेंटिलेटर) देऊ नये. 

        घटनेने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. याचाच अर्थ घटनापीठाने सन्मानाने मरण्याचाही अधिकार दिला असल्याचे ध्वनित केले आहे. घटनापीठातील चार न्यायाधीशांनी आपले मत मांडले. परंतु पाच सदस्यीय घटनापीठाने जिवंतपणी मृत्यूपत्र करुन स्वेच्छा मरणाचा पर्याय योग्य असल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले.

        कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे की या तऱ्हेचे मृत्युपत्र अमलात आणून स्वेच्छा मरण द्यायचे असेल तर हा अधिकार कोणाला आहे याचे स्पष्ट निर्देश असायला हवे. त्याचप्रमाणे रुग्ण उपचारापलीकडे गेला आहे का, त्याला परिस्थितीचे कुठलेही भान नसून तो पुन्हा बरा होऊ शकत नाही का आदी गोष्टींची खातरजमा वैद्यकीय मंडळाने करणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!