News Flash

टोपच्या बिरदेव यात्रेसाठी मंदिर परिसरातील कामास प्रारंभ

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथील श्री बिरदेवाच्या त्रैवार्षिक यात्रेस  रविवार दि. १८ मार्च म्हणजे गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी यात्रा कमिटीकडून मंदिराची स्वच्छता आणि विद्युत रोषणाईच्या कामास सुरुवात झाली आहे.

श्री बिरदेव हे खाटीक समाज परिसरातील धनगर समाज, तसेच टोपचे ग्रामदैवत असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या काही भागातील भाविकही या त्रैवार्षिक जळ यात्रेस येतात. नवसाला पावणारा देव अशी या देवाची ख्याती आहे. गुढीपाडव्यादिवशी येथे संकेश्वर व कोतोली येथील मानाच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. सर्व पालख्या गावातील देवमाळी येथे येऊन पुन्हा गावातील मुख्य मार्गावरुन वाजत गाजत मंदिराकडे जाणार आहेत. तसेच त्रैवार्षिक यात्रा असल्याने देव पंचगंगेला स्नानाला (जळाला) ही जातो. पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम होतात. यावर्षी भाविकांची राहण्याची आणि पाण्याची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले.  भाविकांना यात्रेच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी एलईडी वॉल लावणार असुन १२ सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत. 

 शिरोली पोलीस स्टेशनचे पो.नि.परशुराम कांबळे यांनी दोन वेळा आढावा बैठक घेऊन यात्रा योग्य नियोजनात व हायवेवरील रहदारीला कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन ठिकठिकाणी पार्किंगचे बोर्ड व सर्व व्यवस्थेचे नियोजन केले आहे. 

.

 

One thought on “टोपच्या बिरदेव यात्रेसाठी मंदिर परिसरातील कामास प्रारंभ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!