News Flash

महावितरणच्या अभियंत्याला २५ हजारांची लाच घेताना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता रणजीत बाळासो पाटील यांना 25 हजारांची लाच घेताना कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. वीज ग्राहकाकडून अपार्टमेंटकरीता वीज जोडणीचे कनेक्‍शनला मंजूरी देण्यासाठी २५ हजार रूपयाची त्यांनी मागणी केली होती.

रणजीत पाटील याची एक वर्षापूर्वीच पेठवडगावहून येथील स्टेशन रोडवरील कार्यालयामध्ये  त्यांची नुकतीच बदली झाली होती.  येथील गर्व्हेमेंट कॉन्ट्रॅक्‍टर उमेश निशिकांत माळी (रा. काडापूरे तळ, इचलकरंजी) यांनी सहा महिन्यापूर्वी शहरातील सप्तसागर व राधाकृष्ण डेव्हलपर्सच्या अपार्टमेंटमध्ये वीज कनेक्‍शन मिळावे या करीता अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करण्यासाठी पाटील याने माळी याच्याकडे २७ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २५ हजार रूपयावर व्यवहार ठरला. ही रक्कम स्विकारताना  विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात  लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!