News Flash

‘भोगावती’मध्ये ११८ दिवसांत ४.६६ लाख मेट्रिक टन गाळप

राशिवडे (प्रतिनिधी) : शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची आज (गुरुवार) सांगता करण्यात आली. कारखान्यात ११८ दिवसांत लाख ६६ हजार ६६४ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले.

हंगाम समाप्तीनिमित्त कारखान्याचे संचालक प्रा.ए.डी.चौगले व त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी चौगले यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील (सडोलीकर), उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कॄष्णराव किरुळकर, संजयसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, धीरज डोंगळे, डी.आय.पाटील, दत्तात्रय मेडसिंगे, रवींद्र पाटील आदी सर्व संचालक,माजी संचालक बी.ए.पाटील, बळवंत पाटील, कार्यकारी संचालक ए.व्ही.निकम, अधिकारी, कर्मचारी, सभासद, तोडणी वाहतूकदार व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!