News Flash

आजरा खून प्रकरणातील ९४ जणांची निर्दोष मुक्तता… 

आजरा (प्रतिनिधी) : येथील अंजुमल इत्तेहादूल इस्लाम संस्थेबाबत येथील मुस्लिम समाजातील माणगावकर आणि दिडबाग गटात झालेल्या वादातून १९९९ साली एकाचा खून झाला होता. या खूनाच्या खटल्यातून ९४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. गडहिंग्लज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी हा निकाल दिला.

२४ जानेवारी १९९९ रोजी बाबासाहेब काकतीकर यांचा खून झाला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या काकतीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यावेळी आजरा पोलिसांनी दोन्ही गटाच्या ९४ जणांना अटक करून कलम ३०२, ३०७, १४७, १४९ आणि ३४-अ नुसार गुन्हे दाखल केले होते.  याबाबतची सुनावणी १९ वर्षे चालली. काल त्याबाबत निकाल लागला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!