News Flash

राज्याचा विकासदर २. ७ टक्क्यांनी घसरला : आर्थिक पाहणी अहवाल

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या (शुक्रवार) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने जादा व भरीव तरतुदी करून शेतकऱ्यांना जादा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्प तयार झाला असून मुनगंटीवार यांनी शेवटचा हात फिरवलाय. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल, असे सूचक विधान त्यांनी केलंय.  

विधानसभेत आज (गुरुवार) काही वेळापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर झालाय. राज्य सरकारवर तब्बल ४ लाख १२ हजार कोटींचे कर्ज आहे. कमी पाऊस, उद्योग क्षेत्रातील मंदी याचा फटका राज्याच्या उत्पन्नाला बसलाय. त्यामुळे करवसुलीतील तूट सुमारे ३५ हजार कोटींवर गेली आहे. आर्थिक ताळेबंदात साडेचार हजार कोटींची तूट दर्शविण्यात आली आहे.

विकासदर गतवर्षाच्या तुलनेत २.७ टक्क्यांनी घसरलाय. मात्र यावर्षी विकासदर ७.३ टक्के राहील, असा अंदाज मुनगंटीवार यांनी वर्तविलाय. त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्प नेमका कसा असेल, याची उत्सुकता सर्वच क्षेत्रात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!