News Flash

गडहिंग्लजमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात… 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  समाजातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव,गडहिंग्लज होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा, महिला बचत गट स्टॉल, शोभा यात्रा अशा विविध कार्यक्रमांनी गडहिंग्लजमध्ये जागतिक महिला दिन आज (गुरुवार) उत्साहात साजरा करण्यात आला. गडहिंग्लज नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग मार्फत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये गडहिंग्लजमध्ये पहील्यांदाच  होम मिनिस्टर ही स्पर्धा घेण्यात आली. याला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये गडहिंग्लज शहरातुन प्रभागानुसार स्पर्धा घेऊन तीन महिलांची निवड करण्यात आली. त्यानंतर होम मिनिस्टरच्या झालेल्या अंतिम फेरीत सविता विठ्ठल कट्टीकर या विजेत्या ठरल्या. तर शीतल बारामत्ती या उपविजेत्या आणि वैष्णवी पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.अभिनेते संजय मोहिते, राजश्री खटावकर, प्रा.शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी महिलांनी मोठी गर्दी केली होती. तसेच पंचवीसहून अधिक महिला बचत गटांचे विविध वस्तूंचे स्टॉलचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन तीन दिवस चालू होते. तसेच शाहु सभागृहामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तर जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता सहा.पोलिस निरीक्षक रीझवान नदाफ यांचे हस्ते उद्घाटन होऊन शोभा यात्रेला सुरुवात झाली. यामध्ये शाळा, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शहरातील विविध महिला गटाचे २१ चित्ररथ सहभागी होते.

यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी,उपनगराध्यक्ष उदय पाटील,मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, महिला व बालकल्याण सभापती श्रद्धा शिंत्रे नगसेवक, नगरसेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच गडहिंग्लज पोलीस ठाण्यातर्फे निवासी मूकबधिर शाळा कडगाव रोड, गडहिंग्लज येथील महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींना पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.हसबनिस यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन  खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी  शिक्षक वर्ग उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!