News Flash

राज्यातील सर्व कृषिपंपांना डिसेंबरपर्यंत वीज कनेक्शन्स् : उर्जामंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात लाख ३९ हजार शेतीपंपाचे वीज कनेक्शन प्रलंबित असून या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व कृषीपंपांना कनेक्शन दिले जातील. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर अतिभारीत झाले आहेत. त्यामुळे आता शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना आणण्यात असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (गुरुवार) विधानसभेत दिली.

आ. जयकुमार गोरे यांनी महावितरणकडून सातारा जिल्ह्यातील ग्राहकांना चुकीची वीज बिले देण्यात येत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ऊर्जामंत्री उत्तर देत होते. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले – वीज बिले दुरुस्तीसाठी यापूर्वीही शिबिरे लावण्यात आली होती. पुन्हा अशी शिबिरे घेण्यात येतील. केवळ ट्रान्सफॉर्मर अतिभारित असल्यामुळे कृषीपंपांचे कनेक्शन्स प्रलंबित आहेत. यावर उपाययोजना म्हणून शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना लवकरच होत आहे. २३६० कोटींची ही योजना असून राज्यातील सर्व शेतकरी या योजनेत आणले जातील. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. या योजनेचे काम सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!