News Flash

अश्विनीच्या हत्येतील आरोपींना पोलीस कमिशनरची मदत : बिद्रे कुटुंबीयांचा आरोप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पो. नि. अश्विनी बिद्रेची हत्या करणाऱ्या आरोपींना नवी मुंबईचे पोलीस कमिशनर हेमंत नगराळे यांनी मदत केली आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी आज (गुरुवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. या वेळी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आलेल्या बिद्रे यांच्या वडिलांनी माझ्या मुलीच्या हत्येप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. मात्र या वेळी त्यांना अश्रू आवरले नाहीत.

बिद्रे कुटुंबीयांनी सांगितले की, अश्विनी बिद्रे हत्येत पोलीस यंत्रणेतील काही अधिकारी आरोपींना मदत करत आहेत. नवी मुंबई पोलीस कमिशनर हेमंत नगराळे यांनीच आरोपींना मदत केली असून त्यांना या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करावे. तसेच तपासामध्ये जी दिरंगाई झाली आहे त्याबाबत मा. न्यायाधिशसो व आयपीएस महिला पोलीस अधिकारी यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमावी. सध्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांची तपास पूर्ण होईपर्यंत बदली करू नये व बदली झालेली महिला पोलीस अधिकारी संगिता अल्फान्सो यांची या तपासाच्या टीममध्ये फेर नियुक्ती करण्याचीही मागणी यावेळी कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

या खटल्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. कुरुंदकरचे भाऊ संजय कुरुंदकर हे सुद्धा पोलीस निरीक्षक असून या प्रकरणाच्या तपासामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते वारंवार भेटल्याचे आमच्या निदर्शनास आले आहेत्यांचे फोन कॉल्स व फोन लोकेशन्स चेक केल्यास ते नोकरीच्या ठिकाणी कमी आणि पनवेलनवी मुंबईतच जास्त दिसतात. त्यामुळे या तपासकामात त्यांच्यामुळे अडथळे येऊ शकतात असा आरोपही या वेळी अश्विनी बिद्रेचे पती राजू गोरे यांनी केला.

मुख्य आरोपी कुरुंदकर यांच्यावर ३१ जानेवारी २०१६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते त्याच पदावर कार्यरत होते. फेब्रुवारीपासून ते दिवाळीपर्यंत कामावरती हजर नव्हते. या संपूर्ण काळात त्यांनी या प्रकरणातील आजऱ्यामधील असो वा अन्य ठिकाणाचे सर्वच पुरावे नष्ट केले असावेत. असे असताना ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी कुरुंदकर यांना कसे हजर करून घेतले असा सवाल करत यामध्ये ठाणे पोलिसांनी कुरुंदकरांची वर्दी कशी शाबूत राहील याची काळजी घेतली होती असा गंभीर आरोपही यावेळी कुटुंबीयांनी केला.

दरम्यान, अश्विनी बिद्रे यांच्या काही अवयवांची कुरुंदकर याने आजाऱ्यातील फार्महाऊस परिसरात विल्हेवाट लावली असावी असा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी अभय कुरुंदकर याच्या मित्रांची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करत आहेत. बुधवारी रात्री एकाची चौकशी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत आजऱ्यातील दोघांची चौकशी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!