News Flash

खा. उदयसिंगराव गायकवाड शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन उत्साहात…

आसुर्ले (प्रतिनिधी) : येथील खा. उदयसिंगराव गायकवाड शिक्षण संस्थेच्या वतीने आज (गुरुवार) महिला दिन साजरा करण्यात आला.  आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज  यांनी पोर्ले येथे मसाई हॉलमध्ये  महिला मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी  गायनॉलॉजिस्ट  डॉ. सोनल वालावलकर आणि शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी डॉ.सोनल वालावलकर यांनी कॅन्सरला सामोरे जातानाया विषयावरती व्याख्यान दिले. तसेच कॅन्सरची लक्षणे, कारणे, कॅन्सर होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी या विषयीची माहिती त्यांनी दिली. तसेच सकस आहार, नियमित व्यायाम आणि आयुष्याकडे बघण्याचा  सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही आजाराला सामोरे जाऊ शकता, असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांनी आई समजून घेतानाया विषयावर व्याख्यान दिले. यावेळी आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सांगरुळकर यांनी ही  बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये पालकांची भूमिकातसेच दहावी आणि बारावीच्या मुलांच्या मनावरती येणारे दडपण हे पालक कसे दूर करु शकतील या विषयावरतीही त्यांनी प्रबपोधन केले. या वेळी शर्वरी सरनोबत, सर्व शिक्षक वर्ग तसेच  आसुर्ले, पोर्ले गावातील महिला उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!