News Flash

मुलगी नको मुलगा हवा ही मानसिकता बदला : मनिषा माने

टोप (प्रतिनिधी) :  महिला ही अबला न राहता सबला बनून समाजाला दिशा देणारी शक्ती बनविण्यासाठी महिलांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे. मुलगी नको मुलगा हवा ही मानसिकता बदलण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तसेच तुम्ही धाडस करा, यश नक्कीच मिळेल. असे प्रतिपादन आज (बुधवार) जि.प. सदस्या मनिषा माने यांनी टोप ग्रामपंचायती मार्फत आयोजित महिलादिन कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. तर संरपंच रुपाली तावडे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा पाटील होत्या.

ग्रामपंचायतीतर्फे उद्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गावातील महिलांसाठी आज खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. महिलांकरिता आज ग्रामपंचायत येथे रांगोळी, निबंध, संगीत खुर्ची अशा स्पर्धांचे आयोजन केले होते. प्रत्येक स्पर्धेसाठी ३ बक्षिसे काढली गेली असून सहभागी होणाऱ्यांना हे प्रशस्तिपत्र दिली जाणार आहेत.

यावेळी पुष्पा आळवेकर, एस.एस.गवळी, ग्रामविकास अधिकारी डी.आर.देवकाते, रेखा कोळी, सुवर्णादेवी पाटील, सदस्य रेखा चौगले, अंजना सुतार, धनश्री लुगडे, रोहिणी कांबळे, राजु कोळी, विश्वास कुरणे, संग्राम लोहार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!