News Flash

कारिवडेत नदीत बुडणाऱ्या तरुणाला मित्रांनी वाचवले…

आजरा (प्रतिनिधी) : कोरिवडे (ता.आजरा) येथील हिरण्यकेशी नदीत  बुडणा-या महेश यशवंत पाटील (वय १९, रा.कोरिवडे) या तरुणाला उमेश मारुती पाटील याने आपल्या मित्रांसह प्रसंगावधान राखून वाचवले. या तरुणाला मित्रांनी जीवदान दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (मंगळवारी) कोरिवडेतील सर्व तरुण आणि दिवसभर रंगपंचमी जोशात साजरी केल्यामुळे आंघोळीसाठी  नदीत पोहायला गेले. महेश याला पोहता येत नसल्याने त्याने पोहण्यास नकार दिला. मात्र काही वेळाने कमी पाणी असलेल्या ठिकाणी अंगावरील रंग धूवुन काढण्याचा म्हणून पाण्यामध्ये गेला. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने पाच वर्षांपूर्वी पाण्यासाठी खड्डा काढला आहे. त्या खड्ड्यात पाय घसरल्याने महेश खाली पडला आणि चिखलात अडकला. त्यावेळी महेश बाहेर न आल्याचे मित्रांच्या लक्षात आले.

यावेळी उमेश पाटील,धनाजी सोनार, अभिजीत पाटील, गणेश पाटील, विपुल पाटील यांनी तत्काळ धाडस दाखवत दहा फूट चिखलात अडकलेल्या महेशला पाण्याच्या बाहेर काढून त्याच्या पोटातील पाणी काढून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच महेशची प्रकृती गंभीर असल्याने  कोल्हापुरातील सीपीआरमध्ये त्याला पुढील उपचारासाठी दाखल केले. यावेळी मित्रांनी दाखवलेल्या धाडस दाखवल्यामुळे सुदैवाने महेशचा जीव वाचला. त्यामुळे कोरिवडे परिसरात महेशच्या मित्रांचे  कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!