News Flash

रविवारी ‘राजर्षी शाहू समता परिषदे’चे आयोजन..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना १९१७ मध्ये हॉटेल सुरू करून दिलेल्या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून रविवार (दि.११) सकाळी ११ वाजता शाहू स्मारक भवन येथे राजर्षी शाहू समता परिषदचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचेचे निमंत्रक वंसतराव मुळीक यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी वंतसराव मुळीक म्हणाले की, विविध धर्मिय आणि समाजाच्या ८५ संस्था, संघटना संलग्न असणा-या राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचतर्फे समता परिषदेचे अयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला पत्रकार ज्ञानेश महाराव सामाजिक समताया विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सकाळी गंगाराम कांबळे यांच्या स्मारकाला मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण केला जाईल. तसेच त्यांच्या वापरात असलेल्या वस्तू व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तर या कार्यक्रामा राजर्षी शाहू विचारांचा वारसा जपणा-या पाच मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यामध्ये देवदासी चळवळीचे प्रा. विठ्ठल बन्ने, माजी महापौर भिकशेठ पाटील, पुरोगामी विचारवंत प्राचार्य राजेंद्र कुंभार, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते बापूसो कांबळे, फासेपारधी समाजाचे कृतीशील व्यक्तीमत्व गणेश काळे यांना गौरविण्यात येणार आहे. तर मुस्लीम बोर्डींगचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी सहनिमंत्रक बबनराव रानगे, इंद्रजीत सावंत, युवराज गवळी, सोमनाथ घोडेराव, उमेश पोर्लेकर, बाळासो लाड, गणी आजरेकर, महेश मच्छले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!