News Flash

औरंगाबाद येथे कचरा डेपोविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

औरंगाबाद (प्रतिनिधी) : महापालिकेकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याविरोधात मिटमिटा आणि पडेगावच्या ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज (बुधवार) हिंसक वळण लागले. पडेगाव येथे कचरा टाकण्यासाठी पोलीस संरक्षणात गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर पडेगावच्या नागरिकांनी हल्ला केला. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात ९ पोलीस जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच पोलिसांनी अश्रुधूराचे दोन राऊंड फायर केले.
हिंसक जमावाने कचऱ्याने भरलेले दोन ट्रक पेटवून दिले. याशिवाय पोलिसांच्या गाड्यांसह अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांचीही तोडफोड केली. या तोडफोडीत सुमारे १०० दुचाकींचे आणि ५ ते ६ खासगी चारचाकी गाड्यांचेही नुकसान झाले आहे. परिस्थिती तणावाची बनवली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेनंतर मिटमिटाकडे जाणारी वाहने नगर नाका येथे पोलिसांनी रोखली. यानतंर अन्य मार्गाने वाहने वळविण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!