News Flash

कर्नाटकच्या लोकायुक्तांवर चाकूहल्ला; हल्लेखोर अटकेत

बेंगळुरू (वृत्तसंस्था) – कर्नाटकचे लोकायुक्त जस्टीस पी. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर चाकू हल्ल्याचे समोर आले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, एक व्यक्ती बुधवारी तक्रार घेऊन लोकायुक्तांच्या कार्यालयात आला होता. त्याचवेळी त्याने जस्टिस शेट्टी यांच्यावर तीन वेळा चाकूने हल्ला केला. बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोर तेजस शर्माला अटक केली आहे. सध्या आरोपीची चौकशी केली जात आहे. जस्टिस शेट्टी यांनी गेल्यावर्षीच जानेवारीमध्ये लोकायुक्त पद सांभाळले होते.

कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर सीएम सिद्धरमैय्या जस्टीस शेट्टी यांची चौकशी करण्यासाठी माल्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. आरोपीने लोकायुक्त कार्यालयात वकील असल्याचे खोटे सांगून प्रवेश मिळवला होता. जस्टीस शेट्टी यांनी जानेवारी, 2017 मध्ये कर्नाटकच्या लोकायुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या आधी जस्टीस वाय भास्कर राव लोकायुक्त होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!