News Flash

विवाहबाह्य संबंधामुळे ५०० संसार उघड्यावर

खामगाव (प्रतिनिधी) : मागील चार वर्षात सर्वाधिक प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने ५०० हून अधिक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यामध्ये पती-पत्नीच्या मित्र-मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप आणि पती-पत्नीमधील असलेला कमी संवाद ही मुख्यत्वे कारणे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे.

८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त या विषयाचा आढावा घेण्यात आला. सध्याच्या युगामध्ये महिला आणि पुरूष समान आहेत. काही ठिकाणी महिला पुरूषांपेक्षा जास्त मेहनत करणा-या दिसतात. नोकरी करून घरकाम करणे आणि नव-याचे पण ऐकणे हे सर्व करत असताना खुप मोठी कसरत महिलांना करावी लागते. परंतु सध्याच्या व्हॉटसअप आणि फेसबुकच्या जमान्यात मात्र पती-पत्नीचा संवादच कमी असल्याने एकमेकांविषयी असलेला गैरसमज वाढत जातो आणि त्याचे रूपांतर विभाजनात होताना दिसत आहे.
एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विभागात ५०० प्रकरणे विवाहबाह्य संबंधाची म्हणजेच अनैतिक संबंधाची दाखल झाले असल्याने आणि हे करत असताना शिक्षा पात्र गुन्हा नसल्यामुळे कायद्याविषयी कुठलीही भिती लोकांमध्ये राहिलेली दिसत नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!