News Flash

निवडेत शेतीपंप वीज तोडणी विरोधात भाजपा युवा मोर्चाचे एमएसईबीला निवेदन…

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील एएसईबीच्या अधिका-यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले. आज (बुधवार) एमएसईबी  सबसटेशन निवडे येथे भाजप युवा मोर्चा, गगनबावडा यांच्या वतीने शेतीपंप वीज तोडणी विरोधात निवेदन देण्यात आले.

इथल्या एमएसईबी अधिका-यांचाय अरेरावीमुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी योजनांचा लाभ  सामान्यांना मिळत नाही, असे मत भाजप युवा मोर्चा गगनबावड्याचे अध्यक्ष अनिल पडवळ यांनी सांगितले. तसेच थकीत बिल शेती पंपाची वीज तोडणी चालू करण्यात आली. पण याचा फटका नियमित बिल भरत असलेला शेतकऱ्यांना होत आहे. यावेळी २५ मार्चपर्यंत विज वितरण तोडणी थांबवण्यात येईल आणि तोडलेली कनेक्शन लवकरात लवकर जोडण्यात येतील, असे आश्वासन अभियंत्यांनी दिले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पडवळ, सचिन जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!