News Flash

जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकिना महिला महोत्सव २०१८’ चे आयोजन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ४३ शास्त्रीनगर, जवाहरनगर येथे सकिना महिला महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दिवसभर विविध कार्यक्रम होणार असून नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांच्या विशेष सहकार्यातून हा महोत्सव होत असल्याची माहिती प्रा. जाहिदा खान यांनी दिली.

वीर कक्कया विद्यालय ग्राऊंड येथे होणा-या या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्ष वैशाली क्षिरसागर, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, बेनजीर फरास, कोमल पोळ, पद्मावती पाटील, मंगल निपाणीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात सकाळी ९ वाजता वूमन टू व्हीलर रॅली, त्यानंतर सकाळी १० ते ४ या वेळेत हेल्थ चेकअप कॅम्प, सायंकाळी ६.३० वाजता एक मिनिट गेम शो,  ७.३० वाजता सकीना खान महिला रत्न २०१८ पुरस्कार आणि बक्षिस वितरण, रात्री ८ वाजता सुरेल गाण्यांची मैफिल आणि कॉमेडी शो, रात्री ९ वाजता पर्यावरण पूरक रंग पंचमी व डान्स धमाल त्याबरेाबर फुड आणि आर्ट फेस्टिवल आदींचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. जाहिदा खान यांनी केले आहे.

One thought on “जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकिना महिला महोत्सव २०१८’ चे आयोजन…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!