News Flash

फॅनकडून बँकेतील सर्व रक्कम संजय दत्तच्या नावे

मुंबई (प्रतिनिधी) :  क्रेझी फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील, याचा नेम नाही. अभिनेता संजय दत्तच्या चाहतीने तर आपली दौलतच संजूबाबा नावे केली. 62 वर्षीय निशी त्रिपाठी यांनी मृत्यूपूर्वी आपल्या सेफ डिपॉझिटमधील रक्कम संजय दत्तच्या नावे केली.
संजय दत्तच्या मनाचा मोठेपणा म्हणजे त्याने यातील एका पैसाही घेण्यास नम्रपणे नकार दिला आहे. बँक ऑफ बडोदाच्या मुंबईतील वाळकेश्वर शाखेला पत्र लिहून ही रक्कम त्रिपाठी कुटुंबाला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
निशी त्रिपाठी कोण आहेत, याची पुसटशी कल्पनाही संजय दत्तला नव्हती. 29 जानेवारी 2018 रोजी पोलिसांनी संजयला फोन केला. ’15 दिवसांपूर्वी निशी यांचं निधन झालं असून त्यांनी आपल्या बँक खात्यातील रक्कम आणि बँक लॉकरमधील ऐवज तुमच्या नावे केला आहे.असं पोलिसांनी संजय दत्तला त्यावेळी सांगितलं.
त्रिपाठी कुटुंबालाही याचा मोठा धक्का बसला.
कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्यामुळे निशी त्रिपाठींचं लॉकर अद्याप उघडण्यात आलेलं नाही. मात्र निशींचा पैसा किंवा संपत्ती याच्याशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, ती संपत्ती त्रिपाठी कुटुंबालाच मिळायला हवी, असं संजय दत्तने आपले वकील सुभाष जाधव यांच्या माध्यमातून कळवलं आहे.
निशी यांनी मृत्यूच्या काही महिने आधी बँकेकडे नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये फिल्मस्टार संजय दत्तअसा उल्लेख असून त्याचा पाली हिलमधील पत्ता लिहिला आहे. कुटुंबाने याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

2 thoughts on “फॅनकडून बँकेतील सर्व रक्कम संजय दत्तच्या नावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!