News Flash

…आणि बीएसएफ जवानाचा सात दिवसांचा पगार कापला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनादर केल्याप्रकरणी एका बीएसएफ जवानाला अजब शिक्षा देण्यात आली आहे. त्या जवानाचा संबंधित विभागाने सात दिवसांचा पगार कापला आहे. पंतप्रधानांशी संबंधित चर्चेदरम्यान जवानाने त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याआधी माननीय किंवा श्री असे आदरार्थी शब्द वापरले नाहीत. यामुळेच त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. संजीव कुमार असे जवानाचे नाव असून तो पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील बीएसएफ मुख्यालयाच्या १५ व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे.

२१ फेब्रुवारी रोजी झीरो परेडदरम्यान पंतप्रधानांबद्दल चर्चा करताना त्याने मोदी प्रोग्रामअसे म्हटले होते. यावर बटालियनचे कमांडिंग अधिकारी अनुप लाल यांनी आक्षेप घेतला होता. पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख करण्याआधी जवानाने आदरार्थी शब्द वापरणे आवश्यक होते. पण त्याने तसे न केल्याने हा पंतप्रधानांचा अपमान असल्याचं बीएसएफचे म्हणणे आहे, अशी माहिती लाल यांनी दिली. लाल यांच्या तक्रारीनंतर संजीवचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!