News Flash

राज्यात सात हजारांच्यावर अंगणवाड्या झाडाखाली…

मुंबई (प्रतिनिधी) : बालकांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात असलेल्या ७ हजार ६५८ अंगणवाडय़ा या झाडाखाली भरत असल्याची गंभीर बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आली. यासंदर्भात लोकलेखा समितीने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. अंगणवाड्यांसाठी सीएसआरचे पैसे वापरता येणे शक्य असतानाही हा निधी जलयुक्त शिवार किंवा इतर कामांसाठी वळवला जात असल्याचा मोठा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा लोकलेखा समितीचा २०१७-१८ चा अहवाल विधानसभेत काल (मंगळवार) मांडण्यात आला.

खेडोपाडय़ात आणि शहरांमधील गरीब वस्त्यांत राहणारे मजूर, कष्टकरी, कामगार आणि शोषित वर्गाची मुले अंगणवाड्यांमध्ये शिकतात. या अंगणवाडय़ांमधून बालकांच्या पालन पोषणाचे तसेच प्राथमिक शिक्षणाचे काम होते. या अंगणवाडय़ांकडे दुर्लक्षातून बालकांच्या सर्वांगीण विकासाला सरकार नख लावण्याचे प्रकार करत असल्याबद्दल लोकलेखा समितीने अहवालात चिंता व्यक्त केली. या अहवालात सरकार हे अंगणवाड्यांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे.

विभागीय सचिवांनी मात्र अंगणवाडय़ा मोठय़ा प्रमाणावर झाडाखाली भरत नसल्याचे सांगितले. त्यांच्या मते औरंगाबाद शहरामध्ये अंगणवाडी सेविकांच्या घरामध्ये अशा अंगणवाडय़ा भरत असून झाडाखाली एकही अंगणवाडी भरत नसल्याची त्यांनी सारवासारव केली आहे. मात्र मोकळ्या जागेवर अंगणवाडय़ा भरत नसतील तर मग २०१६ पासून अंगणवाडय़ांच्या दुरुस्तीसाठी कोणतेही नियोजन का करण्यात आलेले नाही, याची विचारणा लोकलेखा समितीने केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!