News Flash

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फोर्ब्सने जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. श्रीमंतांच्या यादी पुन्हा एकदा अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जगातील सर्वातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पीएनबी घोटाळेबाज नीरव मोदीला यामध्ये सर्वात मोठा झटका बसला आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर नीरव मोदीचं नाव फोर्ब्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे.

फोर्ब्सने जारी केलेल्या २ हजार श्रीमंत लोकांच्या यादीत नीरव मोदीला स्थान नाही. नीरव मोदीच्या संपत्ती जवळपास ९४ टक्के घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या यादीत नीरव मोदीचा टॉप १०० श्रीमंत हिंदुस्थानींच्या यादीत समावेश होता. त्याची संपत्ती त्यावेळी एकूण संपत्ती १.८ बिलियन डॉलर (११ हजार ६०० कोटी) इतकी होती. तर पंजाब नॅशनल बँकेंच्या घोटाळ्याच्या रकमे एवढीच मोदीची संपत्ती होती.

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस ११२ मिलियन डॉलरसह पहिल्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स ९० बिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहेत तर बर्कशायर हाथवेचे सीईओ वॉरन बफेट तिसऱ्या स्थानवर असून त्यांची एकूण संपत्ती ८७ बिलियन डॉलर आहे.

 

One thought on “अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती”

  1. Hartley congratulations sir, I’am proud of , Because i am working in Amazon.

    Regards,
    Manisha Courier, ( IHS )
    Sangli Maharashtra 416416

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!