News Flash

…तर जिंकलेली राज्ये त्याच्या हातून निघून  : धनंजय मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप एक एक राज्य जिंकत आहे, परंतु त्यांची अवस्था शेवटी सिकंदरासारखी होणार आहे. जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला राज्य करता आले नाही, त्यामुळे जिंकलेली राज्ये त्याच्या हातून निघून  गेली, तशीच अवस्था भाजपची होणार आहे, असा जोरदार हल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर चढविला.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे धर्माबाबा या ८० वर्षांच्या शेतकऱ्याला मंत्रालयात विष प्यावे लागले, त्या क्षणालाच भाजप सरकारची उलटगणती सुरू झाली आहे, जनतेला आणि राज्यपालांनाही फसवणाऱ्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव अटळ आहे, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.

छत्रपतींचा आशीर्वाद, चले चलो मोदीजी के साथ, अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा विसर पडला. त्यांनी त्यातील आंतराष्ट्रीय शब्द काढला आणि आता फक्त शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असे स्मारकाचे स्वरूप राहणार आहे, ही फसवणूक आहे, अशी टीका त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले, त्याला अडीच वर्षांचा कालावधी लोटून गेला, स्मारकाचे काम कधी सुरू होणार असा सवाल त्यांनी केला. महात्मा जोतिबा फुले यांनी गोरगरिबांच्या मुला-मुलींसाठी शाळा सुरू केल्या, परंतु हे सरकार १३०० शाळा बंद करायला निघाले आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!