News Flash

दुध उत्पादकांच्या मुलींचे यश गोकुळला भूषणावह : विश्वास पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दुध प्रकल्प येथे विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कणेरी (ता.पन्हाळा) येथील कु.अश्विनी आनंदराव लगारे तसेच पणोरी ( ता.राधानगरी) येथील कु.नलिनी चंद्रकांत डवर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील दोन मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात संपादन केलेले यश हे गोकुळला भूषणावह असल्याचे मत गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

अश्विनी लगारेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले.  तर नलिनी डवरने क्रिडा क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती एकलव्य दिव्यांग राज्य पुरस्कार प्राप्त करून नाव लौकिक मिळवलेला आहे. त्यांच्या या यशाला गोकुळचा महिला सबलीकरण कार्यक्रम निश्चितच उपयुक्त ठरलेला आहे असा माझा विश्वास आहे. ग्रामीण भागातील दुध उत्पादकांच्या मुली याप्रकारचे यश संपादन करतात याचा गोकुळला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात या दोघींनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील उदयोन्मुख मुलींना करून द्यावा, असे आवाहन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले. तसेच श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर आणि सौ.अनुराधा पाटील यांच्या हस्ते या दोघींचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!