News Flash

आजरा नगरपंचायतसाठी सर्वपक्षीय विकास आघाडी स्थापन

आजरा (प्रतिनिधी) : आजरा नगरपंचायत निवडणुकीसाठी अण्णाभाऊ समूहाच्या पुढाकाराने भाजप, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी पक्ष या पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्वपक्षीय विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ समूहाचे प्रमुख व कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी होते.

दरम्यान भाजपप्रणीत आघाडी होईल अशी अनेकांची अटकळ बंदी होती. मात्र आजच्या बैठकीत सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना बोलावून इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ होत आहे. अण्णाभाऊ समूहाने सर्वच पक्षांना सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जनता शिक्षण संस्थेचे संचालक दिनेश कुरुणकर हे मेळाव्याला अनुपस्थित राहिले असल्याने त्यांच्या अनुपस्थित बाबतची चर्चा उपस्थितीच्या चालू होती त्यांच्या अनुपस्थित का अशीही चर्चा चालू होती.

यावेळी अरूण देसाई, प्रा सुधीर मुंज, डॉ. अनिल देशपांडे , विजय पाटील, जनार्दन टोपले, दिवाकर नलवडे, सुधीर कुंभार, सुरेश कुंभार, दशरथ अमृते, संजय सावंत, धनाजी पारपोलकर, विजय थोरवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!