News Flash

गाडी अड्डा परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.२ शिवाजी मार्केट कार्यालयाकडून आज करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेत आज व्हिनर्स कॉर्नर येथील गाडी अड्डा परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये ४५ वाहने यामध्ये ट्रक, डंपर व जुन्या गाडया, तीन शेड काढण्यात आले. तसेच साफसफाई करुन एकूण ३०००० स्केअर फुट जागा रिकामी करण्यात आली. सदरची कारवाई मंगळवारीही सुरु राहणार आहे. सदरची जागा रिकामी करुन मुरुम टाकून सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

महालक्ष्मी तिर्थक्षेत्र आराखडयामध्ये व्हिनस कॉर्नर (गाडी अड्डा) या परिसरात असणाऱ्या म.न.पा.पार्किंगच्या जागेत पार्किग सुविधा व भक्त निवास उभारण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सदरचा परिसर अतिक्रमणमुक्त करुन जागा रिकामी करण्याची कारवाई आजपासून करण्यात आली. गाडी अड्डा या ठिकाणी स्क्रॅप व्यावसायिकांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केले होते. याठिकाणी बंद वाहने आणून तोडून स्क्रॅपचा व्यवसाय केला जात होता.
सदरची कारवाई उपशहर अभियंता एस.के.माने, कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे, राजेंद्र वेल्हाळ, अनिरुध्द कोरडे, चारही विभागीय कार्यालयाचे ९० कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, ४ डंपर, ४ जेसीबी, क्रेन यांच्या साहय्याने राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!