News Flash

पुर्व भागाच्या पाणी प्रश्नी पालकमंत्र्याना साकडे 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज विभागाच्या शेती आणि पिण्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधणारे निवेदन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आले. बसर्गे ( ता.गड) येथील एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी पालकमंत्री आले असता केदारी रेडेकर फौडेशनच्या पदाधिकाऱ्यानी पाणीप्रश्नी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. खासकरुन हलकर्णी विभागातील वीस खेडयांचा गंभीर झालेला प्रश्न सोडवन्यासाठी हिरण्यकेशी व घटप्रभा या नद्यांतील पाणी जलवाहिनीद्वारे आणून तेरणी व येणेचवंडी या तलावात घेतल्यास पाणीप्रश्न सुटु शकतो. याबाबतही निवेदनातुन आग्रह धरण्यात आला.

गडहिंग्लज विभागातील सात टीएमसी मंजूर पाण्यातील उचंगी,आंबेओहोळ सर्फनाला असे प्रकल्प अंतिम टप्प्यात रखडले आहेत.अठ्ठावीस जानेवारीला पालकमंत्र्याच्या उपस्थितीत गडहिंग्लज येथे झालेल्या पाणी परिषदेत चंद्रकांतदादांनी येत्या जून महिन्यात उचंगी प्रकल्पात पाणीसाठा करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच अन्य प्रकल्पाबाबतही सरकारात्मक निर्णय शासन घेईल अशी ठाम भूमिका मांडली होती. त्याच घोषणेचा पाठपुरावा करण्यासाठी बसर्गे येथे पदाधिकाऱ्यानी त्यांना भेटुन घेवून सविस्तर निवेदनातुन लक्ष वेधले. रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करणे पूर्व भागासाठी जलवाहिनीतुन नद्यांचे पाणी आणने, भविष्यकालीन विचार करुन या विभागाला पाच टीएमसी नवीन पाणी मंजूर करणे आणि चित्रीचे सध्याचे लाभक्षेत्र खोत बंधाऱ्यापर्यत वाढविणे या मुद्यांचा निवेदनात समावेश आहे. हाच प्रश्न बसर्गे येथील कार्यक्रमात प्रांताधिकारी संगीता चौगुले, डॉ. राजेंद्र हिरेमठ, आमदार संद्यादेवी कुपेकर यांनीही आपल्या भाषणात  पुर्वभागातील विस खेडयांच्या गंभीर पाणीप्रश्नांकडे लक्ष वेधुन उपाययोजना करण्याची मागणी केली. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात गडहिंग्लज विभागाच्या पाणीप्रश्नासाठी ठोस निर्णय घेवुन तातडीने त्याची कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली. केदारी रेडेकर फौडेशनने गेल्या तीन महिन्यापासून भेटी गाठी व चर्चा सुरु आहे. बसर्गे येथे भेटलेल्या शिष्टमंडळात अड. सयाजीराव पाटील, के. आय. सत्तीगेरी, एम.बी. भंगारी, जोतिबा हुबळे, दयानंद देसाई, प्रविण चौगुले, राजू सन्ती, के.बी. इंगवले, राहुल चौगुले यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!