News Flash

जिल्हा नियोजन मंडळाची आरोग्यशिबीर कॅन्सरग्रस्त रूग्णांना दिलासा : प्रदिप झांबरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाकडून नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत प्रथमच जिल्ह्यातील करवीर तालुक्यास २५ लाख रूपयांच्या अनुदानातुन ग्रामीण भागातील संशयीत कॅन्सरग्रस्त रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची योजना म्हणजे कॅन्सरग्रस्त रूग्णांना दिलासा असल्याचे मत करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदिप झांबरे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरोग्य विभाग आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांचे वतीने भुये येथील आरोग्य शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. डी. नलवडे यांनी तालुक्यातील ४२५ स्वयंसेवांकामार्फत गेल्या महिन्यात घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून तालुक्यातुन जवळपास २७०० संशयीत रूग्णांची यादी करणेत आली असुन त्यापैकी निवडक ४५० रूग्णांची  प्राथामिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिका-यांमार्फत तपासणी करणेत आली. या शिबीरात  कॅन्सर रूग्णांना उपचारासाठी अनुदान मंजुर होणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कॅन्सर तज्ञ  डॉ. आरती देशमुख यांनी या असाध्य आजारावरील आधुनिक उपचार पध्दती समाजावुन देण्याबरोबरच लोकांनी चांगल्या सवयींचा अवलंब करून व्यसनांपासून दुर राहणे आवश्यक असुन प्राथमिक  उपचार केल्यास कॅन्सर रोगमुक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाजीराव पाटील यांनी कॅन्सर रूग्णांनी खचुन न जाता धैर्याने सामोरे जाणेचा उपदेश दिला.

यावेळी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटीलसरपंच रमेश कांबळेशियेचे सरपंच नंदकुमार पाटीलवडणगेचे सरपंच सचिन चौगलेविक्रम पाटीलजयश्री तळेकररूपाली सुतार, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

One thought on “जिल्हा नियोजन मंडळाची आरोग्यशिबीर कॅन्सरग्रस्त रूग्णांना दिलासा : प्रदिप झांबरे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!