News Flash

आजरा नगरपंचायतच्या मतदार यादीत फेरबदलासाठी राष्ट्रवादीचे उपोषण 

आजरा (प्रतिनिधी)  :  आजरा नगरपंचायतच्या निवडणुकी मतदार यादीमध्ये जाणीवपूर्वक फेरबदल करून प्रसिद्ध केल्याच्या निषेर्धात लाक्षणिक उपोषण करण्याचे निवेदन राष्ट्रवादीने प्रशासक तथा तहसीलदार अनिता देशमुख यांना दिले आहे .

निवेदनात म्हटले आहे की कच्च्या मतदार यादीवर घेतलेल्या हरकतीचा निर्णय कोणतीही शहानिशा न करता चुकीचा निर्णय घेतला कच्च्या यादीतील तक्रार नसतानाही  नावे कमि  करणेत आलि. प्रभाग क्र.१४,६ व १० मध्ये पुरावा नसतानाही अन्य प्रभागांमधील नावांचा समावेश काही प्रभागामध्ये जाणीवपूर्वक अन्य प्रभागात समावेश करण्यात आल्याने उद्या पासुन   शेकडो कार्यकर्त्यांसह उपोषण करण्यात येणार आहे .

यावेळी जयवंतराव शिंपी,  मुकुंदराव देसाई, बशीर खेडेकर,  रशिद पठाण,  कृष्णा पटेकर, विक्रम देसाई, अशोक पवार, अशोक पाचवडेकर , अमित खेडेकर, पांडुरंग मोहिते, यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!