News Flash

आमदार शशिकांत शिंदे थोडक्यात बचावले

सातारा (प्रतिनिधी) :  माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे रविवारी रात्री जावळी तालुक्यातील अंधारी फाटा येथे झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शिंदे यांची कार खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांमध्ये अडकली. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले.

महाबळेश्वर येथील रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी शिंदे रामेघरकडे जायला निघाले होते. मात्र कार्यक्रमस्थळी जाण्यास उशीर झाल्याने त्यांच्या चालकाने कार वेगाने चालवली. मात्र कारचा वेग जास्त झाल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अंधारी फाट्याजवळील एका वळणावर रस्त्यावरील बारीक खडीवरून कार घसरत दरीच्या बाजूला कलली आणि दरीच्या टोकावरच असलेल्या झाडांमध्ये ही कार अडकली. यावेळी शिंदे आणि त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ कारमधून उड्या मारल्या. त्यामुळे हे दोघेही थोडक्यात बचावले. या अपघातात शिंदे यांना किरकोळ दुखापत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!