News Flash

९० व्या ऑस्करवर ‘द शेप ऑफ वॉटरचा’ दबदबा, तर हार्वीसारख्या नराधमांचा ‘टाईम्स अप’

लॉस एंजेलिस (वृत्तसंस्था) :  गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा संपूर्ण कलाविश्वाला लागून राहिली होती, तो ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकता लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. मुख्य सोहळा रंगण्यापूर्वीच ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्करमध्ये हार्वी विनस्टीनविरोधात अनेकांनीच आवाज उठवत लैंगिक शोषणाविरोधात आपली ठाम भूमिका मांडली. अभिनेत्री अॅशली जड आणि मिरा सोर्विनो या दोघींनी सुरुवातीपासूनच टाईम्स अपचा म्हणत सर्वांचं लक्ष वेधले. तर ज्येष्ठ अभिनेत्री रिटा मोरेनो यांनी ५६ वर्षांपूर्वीचा ड्रेस घालत ऑस्करच्या रेड कार्पेटची शान वाढवली.

रेड कार्पेटच्या झगमगाटानंतर लोकप्रिय सूत्रसंचलक जिम्मी किम्मेलने ऑस्करच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात केली. जिम्मीने नेहमीप्रमाणेच सद्यस्थितीला सुरु असणाऱ्या काही मुद्द्यावर उपरोधिक टीका करत कार्यक्रम पुढे नेला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तब्बल १३ नामांकनं मिळवणाऱ्या द शेप ऑफ वॉटरया चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासह या चित्रपटाच्या खात्यात एकूण चार पुरस्कारांची नोंद झाली आहे. त्याशिवाय कोकोआणि डंकर्कया चित्रपटांनाही यंदाच्या ऑस्करने गौरवण्यात आलं. ९० व्या ऑस्कर सोहळ्यात द पोस्टया चित्रपटासाठी अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना पुरस्कार मिळेल अशी अनेकांचीच अपेक्षा होती पण, त्यांना शह देत फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) या अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!