News Flash

आयोध्या वादासंदर्भात बोलले श्री श्री रविशंकर !

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : बाबरी मस्जिद रामजन्भूमी प्रकरणात आज आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक यांनी आज वादग्रस्त ठिकाणी राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम समाजातून मोठ्या प्रमाणात सहानुभूती आणि सहकार्य मिळत असल्याचा खुलासा केला आहे. शिवाय आपण  कोर्टाबाहेर तोडगा काढण्याबाबत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

एएनआय या वृत्तसंस्थेल्या दिलेल्या मुलाखतीत रविशंकर यांनी आज हा खुलासा केला आहे. सध्या रवि शंकर या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या भेटी घेऊन कोर्टाबाहेर सामोपचारानं हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सीरियामध्ये सत्तारूढ अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारविरोधात गेली आठ वर्षे बंडखोरांनी युद्ध छेडले असून प्रचंज प्रमाणात संहार झाला आहे. या यादवीमध्ये ४,६५,००  सीरियन मारले गेले आहेत तर १० लाखांपेक्षा जास्त जखमी झाले व जवळपास सव्वा कोटी सीरियन विस्थापित झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यात सीरियन प्रश्न आणखी चिघळला असून एकाच ठिकाणी तब्बल ६०० जण बळी गेले आहेत. सीरियाचं उदाहरण देताना रवि शंकर यांनी मुस्लीमांनी अयोध्येवरचा दावा सोडावा असा सल्ला दिला आहे.

श्री श्री रविशंकर यांनी अयोध्येच्या वादावर काय तोडगा निघू शकतो, याचा पुनरुच्चार केला. आऊट ऑफ कोर्ट सेटेलमेंटसाठी आपण प्रयत्न करत असून सर्वच समाजाच्या  लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे रामजन्मभूमीचा मुद्दा कोर्टाबाहेर सुटण्याचे संकेतच रविशंकर यांनी दिले आहेत. याशिवाय त्यांनी या वादावर  तोडगाही सुचवला आहे.   सध्याची एक एकरची विवादित जागा, ज्यावर आता नमाज पडता येत नाही.  ती जागा मुस्लिमांनी हिंदूंना भेट द्यावी. जवळच हिंदूंनी ते १० एकर जागा मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना भेट द्यावी, असं श्री श्रींचे मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे दोन पैकी एका समूदायाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मी कोर्टाचा आणि येणाऱ्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो, असेही ते म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!