News Flash

ऑस्कर सोहळ्यात शशी कपूर, श्रीदेवींना श्रद्धांजली

लॉस एंजेलिस (वृत्तसंस्था) :  भारतीय सिनेमाचे आयकॉन असणारे दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि पहिली भारतीय महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे स्मरण ऑस्कर सोहळ्यातही करण्यात आले. ९० व्या ऑस्कर सोहळ्यात एडी वेडर यांनी टॉम पेट्टीचं रुम अॅट द टॉपगाणं गाऊन या भारतीय कलाकारांना सांगितिक श्रद्धांजली वाहिली.

अभिनेत्री जेनिफर गार्नर यांनी ऑड्री हेपबर्न या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरूवात केली. दु:खाशिवाय सुखाला अर्थ नसतो, म्हणत सिनेजगतातल्या निखळलेल्या ताऱ्यांना गार्नर यांनी श्रद्धांजली वाहिली.
पृथ्वीराज कपूर यांचे सुपुत्र शशी कपूर यांनी १९६१ मध्ये धर्मपुत्रसिनेमात बालकलाकार म्हणून काम करत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांना २०११ साली भारत सरकारने पद्मभूषण सन्मान देऊन गौरवलं होतं. शशी कपूर यांना २०१४ सालचा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. नृत्य, हावभाव, कॉमेडीचा टायमिंग असं प्रत्येक प्रकारचं कौशल्य असणारी हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी यांचं नुकतंच झालेले निधन त्यांच्या लाखो चाहत्यांना चटका लावून गेलं. या दोहोंच्याही कार्याची दखल ऑस्कर सोहळ्याने घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!