News Flash

विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक अविश्वासाचा ठराव आणणार!

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा अध्यक्ष सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी आज विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषदही घेतली.
गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचं कामकाज होऊ दिले जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकले.  त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचे ठरवले आहे.से विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
विरोधी पक्षाने आज हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वासाचा प्रस्तावही दाखल केला आहे. त्यामुळे आता यापुढे विरोधी पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!