News Flash

गोकुळच्या कर्मचाऱ्यांचा नवीन वेतनवाढ करार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ व्यवस्थापन व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये होणारा त्रैवार्षिक करार पूर्ण झाला असून कर्मचारी संघटना व व्यवस्थापन या दोन्ही बाजूकडील प्रतिनिधींच्या सह्या होऊन चेअरमन विश्वास पाटील यांच्याकडे करार सुपूर्द करण्यात आला.

गोकुळकडील १५०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्याना याचा लाभ होणार असून सरासरी दरमहा ३७०० रूपये इतकी पगारवाढ प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार आहे. या कराराद्वारे गोकुळ व्यवस्थापनाने कर्मचाऱ्याना ६ कोटी ६६ लाख रुपये इतकी वार्षिक वाढ दिलेली आहे. आजपर्यंतच्या कामगार संघटनेबरोबर झालेल्या ९ करारापेक्षा आत्ताच्या १० व्या करारामध्ये सर्वात जास्त पगारवाढ गोकुळने

कर्मचाऱ्याना दिलेली आहे. याबाबत बोलताना चेअरमन विश्वास पाटील यांनी सातत्याने वाढणाऱ्या महागाईचा विचार करून तसेच कर्मचाऱ्याना आर्थिक स्थैर्य देण्याच्या हेतूने गोकुळने ही वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोकुळच्या यशामध्ये दुध उत्पादकाबरोबरच कर्मचाऱ्यांचाही महत्वाचा वाटा आहे. याचाही विचार या पगारवाढीमागे आहे. याकामी माझे सर्व सहकारी संचालक तसेच संघटनेचे

पदाधिकारी याचबरोबर कार्यकारी संचालक व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे असे स्पष्ट केले.

या पगारवाढीमुळे गोकुळच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून गोकुळमुळे आम्हाला स्थैर्य प्राप्त होऊन आम्ही जीवनात यशस्वी झालो अशा

प्रकारच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून येत आहेत. तसेच त्यांनी याबद्दल गोकुळ व्यवस्थापनास धन्यवाद दिले आहेत.

याप्रसंगी कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, अस्थापना विभागाचे अधिकारी डी.के.पाटील, रामकृष्ण पाटील, गोकुळच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस.बी.पाटील, जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, सहा.सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम, पदाधिकारी कॉ.शंकर पाटील, मल्हार पाटील, बी.आर.पाटील, स्वीय सहाय्यक सचिन पाटील तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!