News Flash

विदयामंदीर मनवाड मध्ये डॉ. व्हसकोटी यांच्याकडून जलशुद्धीकरण मशिनरी

हलकर्णी (प्रतिनिधी) : मनवाड (ता. गडहिंग्लज) येथील विदयामंदीर मध्ये समाजरत्न डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी स्वखर्चातून ४० हजाराची जलशुद्धीकरण मशिनरी दिली असून विदयार्थीना आता शुद्ध पाण्याची उपलब्धता झाली आहे.

यावेळी डॉ. व्हसकोटी म्हणाले, ग्रामीण भागात अनेक गावांत जलशुद्धीकरण प्रक्रिया होत नसल्याने येथील नागरिकांना, विध्यार्थ्यांना अशुद्ध पाण्याचाच पिण्यासाठी वापर करावा लागतो. अशुद्ध पाण्यामुळे विदयार्थीचे आरोग्यच धोक्यात आले आहे. याचाच विचार करून मनवाड मध्ये छोटे जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याचा विचार मनाट आला. यावेळी शाळेसाठी पाण्याची मशिनरी दिल्याबद्दल रवी अस्वले यांच्या हस्ते डॉ. व्हसकोटी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच साधना कलगोंडा, मु.भास्कर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती पाटील, रमेश कलगोडा, उत्तम तराळ, बशीर  अहमद करीमगोळ, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!