News Flash

शेळोली येथील अशोक देसाईना कृषिरत्न पुरस्कार

करडवाडी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील प्रगतशीर शेतकरी अशोक गणपती देसाई (ए.जी.) यांनी राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर नुकत्याच झालेल्या सतेज कृषी महोत्सवात देसाई यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. देसाई कुटुंबियांचे शेतीत नेहमी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीतील उत्पादन कसे वाढवता येईल याचे प्रयत्न असतात.

देसाई यांनी आजपर्यंत विविध स्पर्धेत भाग घेऊन आपले शेतीविषयी प्रेम दाखवून दिले आहे. यापूर्वी त्यांनी सन २०१४-१५ च्या तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत द्वितीय तर २०१५-१६ साली प्रथम क्रमांक मिळवला होता. या वर्षीच्या २०१६-१७ राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी हेक्टरी भाताचे १०९ कि. उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला.शिवाय आपल्या गावी आत्मा अंतर्गत भुमीपुत्र शेतकरी मंडळ स्थापन करून शेती उत्पादन वाढीसंबधी नवनवीन तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी शेती तज्ज्ञांची चर्चासत्रे व व्याखाने आयोजित केली जातात.

यासाठी त्यांना पं. स. कृषी अधिकारी काळे, सिद्धनवार, तालुका कृषी अधिकारी भिंगारदिवे, भांडवले, कांबळे, पी.एम.परीट, एस. एफ. सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!