News Flash

मुलांच्या बौद्धिक विकासासाठी बी.टी.एस. परीक्षा प्रेरणादायी ठरेल : दीपक मेंगाणे

करडवाडी (प्रतिनिधी) : लहानपणापासूनच मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी बी.टी.एस. परीक्षा प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन पंचायत समिती भुदरगड चे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले. विद्या मंदिर शेळोली शाळेच्या शताब्दी महोत्सव दरम्यान आयोजित बी.टी.एस. स्पर्धा परिक्षेच्या सराव प्रश्नपत्रिका उदघाटन प्रसंगी बोलत होते.

मेंगाने पुढे म्हणाले की, या शताब्दी महोत्सवा निमित्ताने शाळेचे चित्र पालटले असून इतर गावच्या शाळांनी त्याचा आदर्श घ्यावा. ही शाळा आता डिजिटल झाल्यामुळे शाळेत गुणवत्ता वाढीसाठी दर्जेदार शिक्षण देण्यास प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले.

यावेळी पंचायत समिती सदस्या कीर्ती देसाई म्हणाल्या,  माझी शाळा समजून शाळेला पं. स. माध्यमातून शाळेला वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू तर उदयसिंह देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी केंद्रप्रमुख इंदुलकर मुख्याध्यापक रमेश कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुवर्णा दळवी, उपाध्यक्ष सतीश देसाई,सदस्य शिवाजी निकाडे, अशोक देसाई, कल्पना जावडेकर, शिक्षण भरत देसाई, योगेश गुरव, स्वप्नील कांबळे, विध्या देसाई, अरुणा गवेकर यांच्यासह शेळोली केंद्रातर्गत सर्व शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक रणजित जावडेकर तर आभार एन. जी. झोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!