News Flash

कोल्हापूरच्या युवा अभियंत्याचा पुण्यात अपघाती मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुण्यातील नवले ब्रीजवर दुचाकी दुभाजकावर आदळून कोल्हापूरचा युवा अभियंता निकेत राजेंद्र पाटील (वय २२ रा. जैन बस्ती गुजरी) याचा मृत्यू झाला. कात्रज येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून तो नोकरीस होता. काम संपवून तो रूमकडे जात असताना अपघात झाला. रविवारी रात्री त्याचा मृतदेह कोल्हापूरातील घरी आणण्यात आला.

अधिक माहीती अशी कीनिकत पाटील याने भारती विद्यापीठ संगणक अभियंता पदवी मिळविली. यानंतर तो वर्षभरापासून पुण्यात नोकरीस होता. कात्रज परिसरात मित्रांसोबत रूम भाड्याने घेवून तो राहत होता. निकतचे वडील शेती करतात. ड्यटी संपवून पहाटे रूमकडे येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावर आदळला. त्याला तत्काळ नजीकच्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पाश्चात वडीलआई व बहीण आहे.

3 thoughts on “कोल्हापूरच्या युवा अभियंत्याचा पुण्यात अपघाती मृत्यू”

  1. अहो परवा पण याच ब्रिजवर अपघात झाला होता पन्हाळा तालुक्यातील माले येथील एक भिलवडी चा एक असे एकुण चौघे मित्र दगावले होते त्या पुलावरून जाताना काही तरी अडचण नाही नव्हे नवले पुलावरून गाडी खाली गेली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!